थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
गुरूवार, १ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

ठळक घडामोडी

कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रोजगार मेळाव्यास भेट देत युवकांशी साधला संवाद

कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रोजगार मेळाव्यास भेट देत युवकांशी साधला संवाद

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २९ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित रोजगार मेळाव्यास भेट देऊन युवकांशी संवाद साधला. युवकांनी उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर आणि एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यांनी स्वागत केले. यावेळी मंत्री लोढा यांनी रोजगार मेळाव्यातील विविध स्टॉल्सना भेट देऊन नियोक्ते, कौशल्य विकास संस्था तसेच सहभागी युवकांशी संवाद साधला.

तरुणांना रोजगाराच्या बदलत्या संधींशी जोडण्यासाठी कौशल्य विकासाला विशेष महत्त्व असून, उद्योगांच्या गरजेनुसार युवकांनी आपली कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे, यावर यावेळी भर देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ या उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित या मेळाव्याचा उद्देश नोकरी इच्छुक उमेदवार आणि नियोक्त्यांना थेट जोडणारे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १,००० हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली. नियोक्ते, कौशल्य विकास संस्था आणि सहभागी संस्थांचे १०० हून अधिक स्टॉल्स यावेळी उभारण्यात आले होते.

0000

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.