अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यातील सर्वात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कांडली येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करताना मुख्याध्यापक मनिष वर्मा व शिक्षकांच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकविण्यात आला.
ठळक मुद्दे
▪️प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
▪️ध्वजारोहणाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अमरावती: अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यातील सर्वात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कांडली येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करताना मुख्याध्यापक व शिक्षकांच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकविण्यात आला. याप्रकरणी काही नागरिकांनी रोष व्यक्त करत कारवाई करण्यासाठी आवाज उठवला मात्र, प्रशासनाला प्रकरण दाबण्यात यश आल्याचे बोलले जात आहे.
शासनाने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याकरिता ध्वजसंहिता निश्चित केली आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयावर, शाळा काॅलेज ध्वजारोहण नियमानुसार होणे गरजेचे आहे. मात्र, काही मुख्याध्यापकांच्या गलथान कारभारामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने आशा शिक्षकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. असाच प्रकार अचलपुर तालुक्यातील कांडली येथे महाराष्ट्र दिनाच्या रोजी सकाळी जिल्हापरिषदेच्या प्रांगणात घडला.
जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री मनीष वर्मा यांनी ध्वजारोहण केले असता. चक्क राष्ट्रध्वज उलटा फडकल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रगीतसुद्धा झाले. ही बाब नंतर उपस्थितांच्या लक्षात येताच उलट फडकलेला तिरंगा खाली उतरवून पुनश्च फडकविण्यात आला. मुख्याध्यापकाच्या या गलथान कारभाराविरुद्ध गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला मात्र, मुख्याध्यापक व शिक्षकांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली तरी जिल्हापरिषद शाळेतील ध्वजारोहण करताना उलटा तिरंगा फडकल्याचे छायाचित्र तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ध्वजारोहणावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, गणमान्य उपस्थित होते. याप्रकरणी विचारणा केली असता, ध्वजाची दोरी तुटल्याने ध्वज उलटा फडकल्याचे मुख्याध्यापक मनिष वर्मा यांनी सांगुन आपली बाजु मांडत प्रकणातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र, या प्रकाराबाबत शाळेत एकच तारांबळ उडाली होती. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतील की, पाठराखण याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आशाच नवनवीन बातमी व अपडेटसाठी स्मार्ट महाराष्ट्र फाॅलो करा.
युट्यूब साठी येथे क्लिक करा