चिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या खडीमल येथे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे गावात टॅंकरने पाणीपुरवठा होत असुन गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
हि बातमी माजी आमदार केवलराम काळे यांना समजताच त्यांनी चिखलदरा तहसीलचे तहसीलदार यांना संपर्क करुन टँकरने वाढीव पाणी पुरवठा करण्याचे सांगितले ते एवढवरच थांबले नसुन त्यांनी मुंबई येथे जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन गावाच्या संदर्भात निवेदन दिले तर आदिवासी विकास मंत्री के. सी.पाडवी यांची सुद्धा भेट घेतली त्यांना सुद्धा मेळघाटमधील व खडीमल गावातील पाणी टंचाई बद्दल सांगितले.
आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्हाधिकारी अमरावती व जिल्हा परिषद चे मुख्याधिकारीण यांच्याशी संपर्क साधुन गावात सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.यावेळी केवलराम काळे यांनी गावकऱ्यांच्या एकुण समस्या जाणून घेतल्या यावेळी गावातील सरपंच तुलसी कास्देकर, संजय धिक्कार, मोतीलाल सावलकर, तानु धिक्कार, गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार केवलराम काळे बोलतांना म्हणाले मेळघाटमधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहु वेळ आली तर रस्त्यावरही उतरुन आंदोलन करु.
नवनवीन माहिती व बातम्यांसाठी www.smartmaharashtra.in ला फाॅलो करा.