मेळघाटातील खडीमल गावात सामाजिक सदभावना मंचचा महाआरोग्य शिबिर संपन्न

maharashtrasmart
3 Min Read
गावातील नागरिकांची योग्य ती तपासणी करून मोफत औषधी वितरण 
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम भागातील चिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या खडीमल हे गाव यावर्षी पाणी टंचाई ने अख्खा महाराष्ट्रात प्रसिद्ध झांल या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खुपचं यातना भोगायला लागल्या घोट भर पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून हातातील कामे सोडून गावातील कोरडी विहीरीवर बराच वेळ थांबून एका पाण्याच्या ट्रॅकरची वाट बघायची टॅंकर मधले पाणी विहिरीत टाकल्या जायचे, नंतर त्या विहिरी मधले दुर्गंधयुक्त दूषित पाणी गावातील नागरिक आपल्या कुटुंबासह घोटभर पाणी पिऊन तहान भागवायचे , दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले .
 पाणी पिल्याने लहान बाळे, वृद्धांची तब्येती खराब व्हायला लागल्या. अशातच खडीमल या गावात रोगराईच्या समस्या निर्माण होत आहे. अशी माहिती काही समाज कार्यकर्त्यांच्या व पत्रकारांच्या मदतीने परतवाडा शहरातील सामाजिक सदभावना मंच महाराष्ट्र जे आपल्या कार्याने महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे . यांना माहिती होताच . त्यांनी खडीमल या गावात महा आरोग्य शिबिर घेण्याचे ठरवले . गावात जायला कठीण असा रस्ता आहे .आपली सोयीसुविधा तेथे होणार कि नाही.परंतु या कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता सामजिक सदभावना मंच महाराष्ट्र ची टीम महाआरोग्य शिबिर साठी अतिदुर्गम भागातील खडीमल या गावात पोहचली . 

सर्व डॉक्टर मंडळी आप आपल्या खाजगी वाहनद्वारे ग्रामीण रुग्णालय चूरणी येथे पोहचली,तेथून रुग्णवाहिका मध्ये बसून या सर्व डॉक्टर मंडळीनी चूरणी ते खडीमल हे १ तासाचे अंतर गाठले.आरोग्य केंद्र खडीमल येथे प्राथमिक केंद्र काटकुंभ ची सर्व चमूनी. या सर्व डॉक्टर मंडळीचे स्वागत केले. या शिबिराला लहान बालके,माता,गरोदर महिला,दातांचे रुग्ण, त्वचेचे रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला ज्यामधे कुपोषित बालके, अँनेमिया,त्वचेचे गंभीर आजार,मुकबधीर बालके आढळून आलीत. यांची योग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आले.व गावातील नागरिकांनी दररोज अंघोळ करावी, स्वच्छ राहावे, आपल्या मुलांबाळाना योग्य वेळी उपचार द्यावा, गरोदर महिलांना व वृध्दांना आरोग्य विषयक सल्ला दिला तसेच गावातील नागरिकांना डॉ राम ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. 

या महा आरोग्य शिबिर मध्ये सेवा देणारे सामजिक सदभावना मंच चे अध्यक्ष व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.राम ठाकरे,दंत रोगतज्ञ डॉ.मोहित डूलानी,डॉ.अमोल मळसने ,डॉ.सामी अल्लाह खान,डॉ.प्रणय उताणे यांनी सेवा दिली. मंचातील तर्फे.सचिन निर्मळ, प्रवीण कोंडे, किशोर भुगुल,महादेव येवले, पत्रकार मारोती दादा पटणकर, अजय काकडे, प्रवीण तायडे ,विशाल मांडगवडे,सुमितभाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्याकरिता डॉ. राजश्री माहूलकर,प्रभारी वैद्यकीय अधिकारी, काटकुंभ)डॉ. सागर कोगद्रे डॉ. शितल अन्नपूर्व सतीश तायडे, श्री गुहाळे, प्रदीप मुंडे, श्री ढोकणे ,श्री. मक्कावार, ज्ञानेश्वर आलोकार,श्रीमती जावरकर ,प्रिती इंगळे,प्रियंका सुर्वे,स्मिता राउत ज्ञानेश्वर मालोकार, मंगेश चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.या मेळघाटातील अतिदुर्गम भागात असलेल्या खडीमल गावात शिबिर घेण्यासाठी खुप कठीण परिश्रम घ्यावे लागेल तरी , सामाजिक सदभावना मंचने कोणतीही हितगुज न करता महा आरोग्य शिबिर यशस्वी पार पाडले.

नवनवीन अपडेट साठी www.smartmaharashtra.in ला फाॅलो करा. 
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *