विदयार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, व ब्लॅकेटचे वाटप
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:-
अमरावती जिल्हातील मेळघाट मधील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गाविलगड शिक्षण प्रसारक मंडळ,गौलखेडा बाजारचे अध्यक्ष स्व. तुकारामजी तुळशीरामजी काळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिम्मित कै. वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळा, नागापुर येथे पुण्यस्मरानिम्मत आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्या व त्यांच्य पत्नी श्रीमती शांताताई तुकारामजी काळे यांच्या हस्ते शाळेचा गणवेश, शैक्षणिक साहित्य, ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, यो भिमराव व सरपंच सुशीलाताई सुखदेव जामकर,उपसरपंच रूपलाल मेटकर,भिमराव काळे,घिसुलाल दहिकर, योगेंद्र काळे, राजेन्द्र काळे, गौरव काळे, तप्रेन्द्र काळे, यशवंत काळे,चेतन जांभेकर,दिगांबर काळे,काळे परिवारातील सर्व सदस्य यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक संजय गावंडे, रतन कास्देकर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संस्थेने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालकन ढवळे सर तर आभार प्रदर्शन नाठे मॅडम यांनी केले.