आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना दिले पत्र
महाराष्ट्र राज्य आदिवासी (Trible) विकास महामंडळ,नाशिक येथे आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक येथे पार पडली. नाशिक येथे 49 वी वार्षीक सर्वसाधारण सभा आयोजीत असतांना सदर सभेमध्ये अध्यक्ष म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना. श्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar गावित) हजर होते. सभेमध्ये आदिवासी विकास महामंडळाचे संचालक, माजी आमदार केवलराम काळे (Kewalram Kale) यांची उपस्थिती होती. मेळघाट (Melghat) व राज्यात सप्टेंबर महिना संपण्याच्या बेतात असताना सुद्धा भरपुर मोठ्या प्रमाणात पाऊस, अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व समाज आदिवासी बांधवानाच्या हाताला काम नसल्यामुळे, आर्थीक अडचणीत येवुन बेरोजगारी निर्माण झालेली आहे. तसेच आदिवासी मजुर व शेतकरी वर्गावर उपासमारीची पाळी येत असल्याचे भविष्यात संकेत दिसत आहे.
या सर्व बाबीचा विचार करून माजी आमदार तथा आदिवासी विकास महामंडळाचे संचालक केवलराम काळे यांनी आदिवासी मंत्री डाॅ.विजयकुमार गावीत यांना खावटी (Khawati) अनुदानाबाबत पत्र देऊन आदिवासी समाजाची दैनअवस्था सांगितली,रोजगार हमीवर काम करणारे,दारिद्रय रेषेखालील BPL धारक, अपंग, विधवा वंचीत,यांना खावटी अनुदानाचे वाटप आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात यावा याबाबत निवेदन दिले असुन सोबतच मेळघाटमधील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली सदर सभेमध्ये आदिवासी बांधवांच्या जनहिताचे निर्णय घेण्यात आले असुन लवकरच योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या सभेमध्ये मंत्री,संचालक, सभासद,व्यवस्थापक उपस्थित होते.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा