अमरावतीच्या अंबादेवीला विदर्भाची कुलदेवता संबोधलं जातं. त्यामुळे नवरात्रीमध्ये भाविक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. संपूर्ण अमरावती शहर भक्तांनी फुलून जातं. अनेक दुकानं थाटली गेल्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं.
जागृत दैवत माझी आई… अमरावतीची अंबाबाई
विदर्भातील प्राचीन शहर अमरावती पौराणिक दृष्ट्याही महत्त्वाचं मानलं जातं. कौंडण्यपूर येथील विदर्भात राज्य करणाऱ्या भीष्मक राजानं आपली सुकन्या रुक्मिणी हिचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता, जो तिला अमान्य होता. तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच तो कौडण्यपूर येते येऊन रुख्मिणी हरण केले. अमरावतीला अंबादेवी मंदिरात आले आणि याच अंबादेवी (Ambadevi Temple) मंदिरात भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे. श्रीकृष्ण काळापासून अस्तित्वात आहे. आजही अमरावती शहरातील तिचं स्थान जागृत समजलं जातं. अमरावतीच्या या अंबादेवी मंदिरात रूक्मिणीने देवीला साकडे घालून इच्छित वराचं दान मागितलं. प्रकटलेल्या अंबादेवीने रूक्मिणीला फुलांची माला दिली. लग्नाला विरोध करणाऱ्या रुक्मिणीच्या भावाला पराजित करून श्रीकृष्ण तिला आपल्यासोबत घेऊन गेला. रूक्मिणीलाही जिचे आशीर्वाद प्राप्त झाले ती अंबा देवी श्रीकृष्णाच्या काळातील अंबादेवीचं देवस्थान इतक्या कालावधीनंतर तसंच टिकून आहे. अनेक वर्षे हे मंदिर एका लहानशा ओट्यावर चार खांबांच्या आधारावर उभं होतं. अमरावती मोठ्या शहरात परावर्तित झालं. तेव्हा हळूहळू त्यास आजचं सुंदर स्वरूप प्राप्त झालं. शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराची बांधणी जुन्या पद्धतीची आहे. सभामंडप लाकडी खांबावर उभा आहे. पूर्वभागात असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सात-आठ पायऱ्या चढून सभामंडप आणि गाभाऱ्याकडे जाता येतं.
कसं आहे मंदिर ?
मंदिरात प्रवेश करताना दिसणाऱ्या दोन शिखरांवरील कळस तांब्याचे आहेत. त्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडपाचं काचेनं मढवलेलं छत आकर्षक आहे. जगदंबेचं हे मंदिर विदर्भातील हजारो लोकांचं श्रद्धास्थान भारतातील शक्तिपीठांपैकी एक समजलं जातं. काळ्या रंगाची, वालुका पाषाणाची श्री अंबादेवीची स्वयंभू मूर्ती आहे. अतिप्राचीन असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. या पूर्णाकृती आसनस्थ मूतीर्चे दोन्ही हात मांडीवर विसावलेले असून डोळे अधोर्मिलीत आणि मुद्रा धीरगंभीर आहे. मंगळवारी आणि पौर्णिमा – अमावस्येला पूजा झाल्यावर देवीला संपूर्ण सुवर्णालंकार चढवण्यात येतात. देवीचा मुखवटा सोन्यानं मढवलेला असून मागे किरीट आहे. कपाळावर बिंदी, पायात वाळ्या, कानात बुगडी, नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि सुवर्णाच्या सऱ्या, कमरेत कमरपट्टा अशा अनेक दागिन्यांसह देवीला नऊवारी साडी नेसवली जाते.
एकवीरा देवी मंदीर Ekvira Devi
एकवीरा देवीच्या मंदिराचा भव्य सभामंडप आहे मंदिरात कोरीव कलाकृती आहे. मंदिराचा जीर्णोउद्धार अलीकडच्या काळात संस्थान ने केला असून नवीन शिल्प कृतीत मंदिर मोठया थाटात उभे आहे. मंदिराच्या तळाशी जिथे जनार्दनस्वामी तपशर्या करायचे त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. त्यामुळे अमरावती येथे माता अंबादेवी व माता एकविरदेवी यांचा दर्शनासाठी नवरात्रात लाखो भाविक मोठ्या रांगा लावतात व मनोभावे दर्शन घेतात याच ठिकाणी भाविकाना पुजेसाठी लागनारी साहित्य फुल, प्रसाद, नारळ, खना नारळाची ओटी चे दुकान सुद्धा सजली आहे त्यांना सुद्धा या काळात चांगला रोजगार मिळतो. पहाटेच्या सनई-चौघड्याच्या सुस्वर भूपाळीनंतर मंदिराचं प्रवेशद्वार उघडतं. भक्तांना अभिषेक आणि शाश्वत पूजा करता येते. पंचामृतादि स्नान केल्यानंतर देवीच्या कपाळावर मळवट भरला जातो. त्यानंतर वस्त्र नेसवली जातात. हारफुलांची आरास करून चांदीचा मुकुट मस्तकावर चढवला जातो. मध्यान्ही महानैवेद्य दाखवून रात्री दहा वाजता जगदंबेच्या शयनासाठी चांदीचा पलंग, मखमली उशा ठेवून शेज तयार केली जाते. नंतर शेजारती होऊन मंदिर बंद होतं.
अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा