स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुक्यातील परतवाडा शहराच्या शेजारी असणाऱ्या कांडली परिसरामध्ये आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह क्रमांक दोन आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड द्यावा लागतो विशेष म्हणजे सर्वात मोठी समस्या त्यांची आज असणारी ती म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची भोजन व्यवस्था केल्या दोन दिवसापासून नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची अतोनात हाल होत आहेत
आज अखेर आदिवासी विद्यार्थ्यांच्या संयमाचा पारा फुटला आणि त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बसून न्याय मागितलाय विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी मुलं हे वसतिगृह क्रमांक दोन कांडली येथे रश्मी नगर या परिसरात राहतात या ठिकाणी विविध प्रकारच्या समस्या गेल्या कित्येक दिवसापासून त्या विद्यार्थ्यांना आहेत परंतु त्या कोणत्याही समस्यांचे आतापर्यंत निराकरण न झाल्यामुळे हे विद्यार्थी संपूर्णपणे हतबल होऊन गेल्यात या वस्तीगृहात विशेष म्हणजे हे जे वस्तीगृह आहे हे खाजगी असून जवळपास एक लक्ष रुपये सरकारतर्फे वैयक्तिक व्यक्तीला त्याचे भाडे दिल्या जाते या ठिकाणी हे वस्तीगृह कोणते प्रकारच्या राहण्यासाठी व सोयुक्त नसून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावा लागत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी असणारे शौचालय व बाथरूम वापरण्यायोग्य नसून याला दरवाजे सुद्धा नाही शिवाय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शीट सुद्धा नाही आहेत. वस्तीगृहात सर्वात मोठा विषय म्हणजे तो विद्यार्थ्यांच्या जेवणाकडे दुर्लक्ष केल्या जात असून त्यांना निकृष्ट प्रतीचे जेवण देण्याची तक्रार सुद्धा विद्यार्थिनी केली आहे परिसरात अक्षरशः स्वच्छतेचे भांडार झाले असून यामुळे वारंवार विद्यार्थी बिमार सुद्धा पडत आहेत खाजगी इमारतीमध्ये चालू असणाऱ्या या वस्तीगृहामध्ये असणाऱ्या वाचनालयाला भांडारगृह बनून ठेवले आहे. तसेच या ठिकाणी भोजनालयाचा ज्याने कंत्राट घेतला आहे तो विद्यार्थ्यांसोबत अक्षरशः हलकट वृत्तीने बोलत असल्यामुळे विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागतो.
सदर आदिवासी वस्तीगृह आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत असून या ठिकाणी वार्डन सुद्धा कायम राहत नसल्यामुळे विद्यार्थी हे वाऱ्यावर जीवन जगत आहेत. आज विद्यार्थी दिवस भरायचे उपाशी होते अखेर त्या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक संस्थांनी त्यांना शिवभोजन थाली चा लाभ घ्यायसाठी पायदळ पाठवले.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा.
Whtas App ला कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा