“शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांची दिवाळी गोड करण्याचा माझा प्रयत्न आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या पैश्याची मदत होवून त्याला आधार मिळावा, हा माझा प्रयत्न आहे.” केवलराम काळे – माजी आमदार, मेळघाट विधानसभा
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:
मेळघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिखलदरा – धारणी तालुक्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मेळघाटमधील आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती असुन त्यांची उपजिविका शेतीवर अवलंबुन आहे.
शेती कामे ठप्प पडली असुन रोजगार हिरावल्याने अनेकांचा उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.दिवाळीचा सण अगदी काही दिवस तोंडावर आला असतांना दिवाळीचा सण साजरा व्हावा अशी प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.संपुर्ण पिक यावर्षी हातातुन गेल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपुर्वी नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा करावे.
यासाठी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांनी उपविभागीय अधिकारी,धारणी यांना निवेदन देण्यात आले दिले यावेळी मेळघाट विधानसभेचे माजी आमदार केवलराम काळे,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष एजाज खान,शेख साबीर, नंदु दहिकर, राधाकिसन, तुमला कास्देकर, मोतीलाल कास्देकर, कमलसिंग वाघमारे,झापु दहिकर, बल्लु जामुनकर यांच्या सह मेळघाट मधील नागरीकांक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा 🙏