Diwali Bonus To Police: महाराष्ट्र पोलिसांना बोनस द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; अतुल खूपसेंचा इशारम

Smart Maharashtra News Network :

महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ दिवाळी बोनस देण्यात यावा. Diwali Bonus To Police: अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन Protest in Ministry करण्यात येईल, असा इशारा जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे President Jan Shakti Sangathan Atul Khupse यांनी दिला आहे.
पोलीस बांधवांची व कुटुंबाची दिवाळी गोड करावी महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ दिवाळी बोनस देऊन पोलीस बांधवांची व कुटुंबाची दिवाळी गोड करावी. पोलीस कर्मचाऱ्यांची आपल्या राज्यात दयनीय अवस्था आहे. इतर राज्यातील पोलिसांना जास्त पगार मिळतो. त्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळतो. अधिकच्या कामाच्या ताणामुळे पोलीस बांधवांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
त्यामुळे त्यांना आरोग्याच्या सुविधा उत्तम दर्जेदार उपलब्ध करून देण्यात याव्यात. ग्रामीण भागातील पोलीस कॉटर्सची दयनीय अवस्था महिला पोलिसांना त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा लक्षात घेऊन ड्युटीचे स्वरूप व पोस्टिंग देण्यात यावे, असे देखील यावेळी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे म्हणाले आहेत.
मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल कोरोना काळात पोलिसांनी सर्वात पुढे राहून काम केले त्यासाठी त्यांना विशेष मानधन सर्वसाधारण बदल्या तात्काळ करावे. तसेच प्रमोशन वेळोवेळी करावे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप थांबवावा. पोलिसांना अल्प दरात घर उपलब्ध करून देणे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तयार करणे आणि पोलिसांना दिवाळी सणानिमित्त बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देणे.पोलीस पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना अमलात आणणे, अशा मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत, तर येत्या 20 ऑक्टोबरला मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी यावेळी दिला आहे.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा 🙏 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *