Pm Kisan Yojana 2022 : केंद्रीय कृषिमंत्री यांची घोषणा १२ व्या हप्त्याची तारीख झाली फिक्स या तारखेला जमा होणार २ हजार रुपये

maharashtrasmart
2 Min Read

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेअंतर्गत मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपयांची पीएम सन्मान निधी वर्षातून तीनदा पाठवली जाते. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये वार्षिक देण्यात येतात.

या दिवशी जमा होणार पैसे
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात १७ ऑक्टोबर रोजी हस्तांतरित केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी (PmKyc) केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल व त्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होतील. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही स्टेटस देखील चेक करू शकता
पीएम किसान स्टेटस चेक करा
केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. आता शेतकरी आधार क्रमांकासह पोर्टलवर जाऊन त्याची स्थिती तपासू शक असेल तर नादणाकृत क्रमाक त्या ठिकाणी टाकावा लागतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी असा नियम होता की शेतकरी त्यांचा आधार किंवा मोबाईल नंबर टाकून त्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची स्थिती तपासू शकतात. यानंतर नियम आला की शेतकरी मोबाईल नंबरवरून नाही तर आधार नंबरवरून स्टेटस तपास शकतात.आता नवीन नियमानुसार, शेतकऱ्यांना आधार क्रमांकावरून स्टेटस नाही तर मोबाईल क्रमांकावरूनच पाहता येणार आहे Pm Kisan Yojana 2022.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा 🙏 
माहिती आवडल्यास पुढे शेअर करा.
Whtas App ला कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा
Message Smart Maharashtra on WhatsApp. 
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *