अखिल भारतीय पत्रकार संघाच्या अचलपुर तालुका अध्यक्षपदी पत्रकार प्रविण तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.प्रविण तायडे हे मिडिया क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय चॅनेल गावरान 90 या वाहिनीचे काम करत असुन आज ते मिडियाच्या माध्यमातून अचलपुर सह जिल्हाभरात अलिकडच्या काळात प्रसिद्ध झाले आहे. प्रविण तायडे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.येथील शासकीय विश्रामगृहावर अचलपुर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. पत्रकार संघाची पुढील कार्यकारिणी अशी आहे, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
तालुकाध्यक्ष पदाला योग्य न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासन प्रविण तायडे यांनी दिले.यावेळी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने ,केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक याहुल, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष अशोक वस्ताणि,जिल्हा कार्यालय प्रमुख निलेश राजस, जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश फरकुंडे,राजेश डांगे,अविनाश तायडे,विजु काकडे,मुसद्दिकभाइ,प्रमोद मुस्कर,संतोष भालेराव यांच्यासह अचलपुर तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.प्रविण तायडे यांच्या अध्यक्षपदाचे सर्वत्र कौतुक होत आहे.