शरद झांबरे यांच्या उमेदवारीला पाचही जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

maharashtrasmart
2 Min Read

विजया करिता विविध पक्ष आणि शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा

अपक्ष व युवा उमेदवार शरद झांबरे पाटील यांना निवडून आणण्यासाठी विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शरद झांबरे यांच्या उमेदवारीला पाचही जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद लाभत असून त्यांच्या प्रचाराला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्ष संघटनांनी केला आहे.
गेल्या बारा वर्षांपासून अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात निर्माण झालेला नेतृत्वाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्व घटकपक्षांनी एकत्रितपणे शरद झांबरे यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम विदर्भातील पदवीधरांना बारा वर्षापासून सतत मुर्ख बनवित आलेल्या भाजपच्या व काॅंग्रेसच्या उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी  शरद झांबरे व सोबत संघटना एकत्र येऊन वज्रमुठ बांधली असून कोणत्याही परिस्थितीत यंदा शरद झांबरे यांच्या रूपाने मतदारसंघाटला एक पदवीधरांना रोजगार मिळवून देणार शरद झांबरे सक्षम नेतृत्व देण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात एका ‘निष्क्रिय’ नेत्याला भाजपने पुन्हा एकदा संधी देत पदवीधरांवर आपली बेबंदशाही थोपविण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप शरद झांबरे यांनी केला आहे. सुशिक्षितांना मुर्ख समजून सहा वर्षातून एकदा मतदारांना तोंड दाखविणे आणि नंतर गायब होणे हा भाजपच्या विद्यमान धुमकेतूचा गोरखधंदा झाल्याचा आरोप शरद झांबरेंनी केला आहे. यंदा शरद झांबरे यांनी मोठ्या संख्येने पदवीधरांची नोंदणी पूर्ण केली असून मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह आहे.  अपक्ष उमेदवार असलेल्या शरद झांबरे यांना युवा वर्गासोबतच विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
पदवीधरांना रोजगार मिळवुन देणार.. 
विविध समस्यांनी घरात असलेल्या पदवीधरांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पदवीधरांचा मतदारसंघ हा संविधानाने सुशिक्षित पदवीधरांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी तयार केला होता. मात्र या मतदारसंघाचा वापर करून भाजपने केवळ आपली आमदारांची संख्या वाढविण्यासाठी केला आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांनी निवडून आल्यानंतर कधीही मतदारसंघाकडे ढुंकून देखील बघितल्याचे दिसून येत नाही. ही वास्तविकता या मतदारसंघातील प्रत्येक जण जाणून आहे. निष्क्रिय नेतृत्वामुळे अमरावती विभागात आज रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. त्यासाठी जबाबदार असलेल्या नेत्यांना धडा शिकविण्याची ही वेळ आल्याचे शरद झांबरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा. 
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *