जुन्या पेन्शनसाठी मागासवर्गिय अधिकारी कर्मचारी महासंघ रस्त्यावर उतरणार : विजयकुमार चौरपगार

maharashtrasmart
3 Min Read
 परतवाडयातील चिंतन सभेत महासंघाचे एल्गार : कर्मचाऱ्यांनी एकजुट होण्याचे आव्हान
 स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : तब्बल अड्डावण वर्ष सेवा करुन सुध्दा उर्वरित आयुष्य पेन्शन विना कुंटुब वाऱ्यावर, आजारपण, मुलाची शिक्षणे लग्ने आकस्मीत मृत्यु झाल्यास कुटुंब उघडयावर हे वास्तव आहे. अनेक शासकीय नौकरीत दिवंगत झालेल्या कुंटुबातील हे चित्र आहे. तेव्हा जुणी पेन्शन लागू झालीच पाहीजे .त्या करीता महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी महासंघ पुर्ण ताकदीनीशी रस्त्यावर उत्तरणार असुन पेन्शन लागु होयी पर्यंत लढणार असल्याचे प्रतिपादण म.रा.मागासवर्गिय अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार चोरपगार यांनी येथे केले.
येथील अष्टमासिध्दी जवळ असलेल्या अनिल इन लॉन सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्गिय अधिकारी कर्मचारी महासंघाने अचलपूर तालुका स्तरीय चिंतन सभेत बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर उपजिल्हाधिकारी रविद्र जोगी, तहसिलदार अनिल भटकर, तहसिलदार धिरज स्थल, नायब तहसिलदार आशिष नागरे, लेखाधिकारी मिलींद देवरे, महासंघाचे कोषाध्यक्ष व्ही यु दंदे सेवानिवृत्त तहसिलदार ज्ञानेश्वर कुमरे, मंडळ अधिकारी राजेश चोरपगार त्रिशरण मोहोड मुरलीधर मुळे, सह आदी मान्यवर मंडळी विचारपिठावर उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी रविद्र जोगी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, मागासगिंय समाजाच्या हक्कसाठी लढणाऱ्या किती संघटना आहेत त्या आपण शोधल्या पाहीजे आपण इतिहास वाचला पण तो समजुन घेतला नाही. त्यामुळे समस्या अधिक बिकट बनली आहे. असे सांगुन विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही जोगी यांनी यावेळी केले.
तर तहसिलदार अनिल भटकर यांनी आरक्षणा संमधी माहीती देत म्हणाले त्यावेळी शिक्षणाची कमतरता होती तरी एकटया शिकलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाचा लढा दिला आज शिक्षणाचे प्रमाण खुप आहे. तरी आरक्षण संकटात आहे. ते आरक्षण वाचविण्या करीता मागासवर्गीयाच्या प्रत्येक घटकाला सज्ज व्हायचे आहे. सोबतच पदोन्नती मधील आरक्षण कसे रद्द केले याबाबत सखोल माहीती भटकर यांनी दिली.
तद्वतच चांदुर बाजार तहसिलदार धिरज स्थूल लेखाधिकारी मिलींद देवरे प्रा.मुळे यांची यथोचित भाषणे झाली जलसंपदा खात्यातील मुख्या लिपीक विनोद नागे व विशाल मोहोड यांच्या अंधश्रध्दा एक सामाजीक किड या पुस्तकाचे प्रकाशण मान्यंवराच्या हस्ते पार पडले .कार्यक्रमाचा प्रारंभ दिपप्रज्वलान करण्यात आले. त्यांनतर संविधान उद्देशिकाचे वाचण करण्यात आले. सामाजीक कार्यकर्ते अनिल इन हॉटलचे मालक अनिल पिंपळे यांचा या प्रसंगी हृदयस्पशी शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम स्थळी आलेल्या प्रत्येकाला गेटवर नाव नोदणी केल्यानंतर गुलाब पुष्प देवुन स्वागत करण्यात आले. सभागृहाची आकर्षक सजावट पाहुण्याचे दिमाखदार स्वागत जबरदस्त नियोजन आणि आयोजकांनी केलेली उत्तम व्यवस्था उपस्थितांचे लक्ष वेधत होते. विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे प्रस्तुत कार्यक्रमास सर्व खात्यातील अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास गुळसुंदरे , संचालन संजय मोहणे तर आभार योगेश रेवस्कर यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता किशोर धवने, अनंत धांडे, संतोष गेठे, विनोद नागे, संतोष वानखडे, सुभाष जाधव, सत्यपाल आठवले, अजय दाभणे अनिल तायडे, गणेश धोटकर, अमर वानखडे, जगन्नाथ गुळदे, सुदर्शन काळे सतिष फत्तेपुरे जितेन्द्र हागे, उदय माहोरे प्रमोद वडस्कर राजेश सरवटकर नशिबकर मामा, रविद्र दारसिम्बे, अविनाश वानखडे, गजानन शेगांवकर, तस्लीम पठान, सचिन गवळी, हर्षद पारधी यांनी कशोसीने प्रयत्न केले सदर कार्यक्रमाची पंचकोशित चर्चा होत आहे.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा. 
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *