बदनामी खपवून घेणार नाही, मानहाणीचा दावा ठोकू :- मा. आमदार केवलराम काळे

धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून त्यासाठी निर्विरोध संचालक निवड प्रक्रियेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना’ घडली नसून माझा यात हस्तक्षेप देखील नाही, परंतू काही वृत्तपत्र प्रतिनिधी बिनबुडाचे आरोप ठेवून माझ्या नावाची मुद्दाम बदनामी करीत आहेत, अश्या चिल्लर वृत्तपत्र प्रतिनिधींना योग्य वेळी योग्य धडा शिकवून त्यांच्या विरुद्ध मानहाणीचा दावा ठोकून फौजदारी कारवाई दाखल करण्यात येईल अश्या आशयाचे लेखी पत्र मेळघाट विधानसभेचे माजी आमदार केवलराम काळे यांच्याकडून प्रसार माध्यमांपर्यंत पसरविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासुन मेळघाट मतदार संघात धारणी कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत आप आपल्या हालचाली व तयारी सर्व पक्षाकडुन सुरु होत्या. कृषी उत्पन्न बाजार समिती धारणी निवडणुक करीता एकुण 100 उमेद्वार रिंगणात होते. गेल्या दिनांक 20 मार्च रोजी 100 उमेद्वारामधुन 71 उमेद्वारांनी आपली उमेद्वारी स्वखुशीने परत घेतली होती.

मी केवलराम काळे माजी आमदार म्हणुन माझ्या कोट्यात एकुण तिन उमेद्वारी आली होती, हे तिन्ही उमेद्वारांना माझ्या संबंधीत कोणतीच तक्रार नाही. हे तिन्ही उमेद्वार माझे कार्यकर्ते आहेत व ते माझ्या मार्गदर्शणाखाली आपली निवडणुक लढत आहेत. मात्र असे असले तरी 21 मार्च रोजी प्रजामंच आणि महासागर वृत्तपत्रात माझ्या विषयी चुकिची बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. या बातमी मध्ये मी पैशे घेऊन उमेद्वारी विकली आहे असा तथ्यहीन आरोप माझ्यावर लावला असुन माझ्या करीता ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. तरी माझ्यावर आरोप लावणाऱ्यांनी मी पैशे घेऊन उमेद्वारी विकली आहे असे सिद्ध करुन द्यावे, जर त्यांनी असे सिद्ध करुन दिले तर मी राजकारणातुन सन्यास घेणार. तरी माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी तात्काळ सार्वजनीकरीत्या माफी मागावी, अन्यथा माझी खोटी बदनामी केल्याप्रकरणी योग्य ती कार्यवाही म्हणजेच मानहानी दावा दाखल करण्यात येईल त्याचबरोबर आरोप करणार्‍यांवर माझ्याकडुन फौजदारी कारवाई संदर्भात देखील दाद मागण्यात येईल तरी आरोप करणाऱ्यांनी यासंदर्भात नोंद घ्यावी.
अश्या आशयाचं लेखी पत्र प्रसार माध्यमांपर्यंत पुरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *