कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता.. शिपाई राहिला शिल्लक

शासकीय काम अन् सहा  महिने थांब… ही म्हण ठाऊक असेलच. अहेरी या दुर्गम शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कारभार यापेक्षा वेगळा नव्हता. उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी वारंवार तंबी देऊनही कामकाजात सुधारणा होत नव्हती. 

अखेर कार्यालयातील या दफ्तर वाघमारे यांनी दफ्तर दिरंगाईमुळे वैतागलेल्या उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी शिपाई वगळता एकुण दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करत घरचा मार्ग दाखवला त्यानंतर आस्थापनेला कुलुप लावत कामचोरांना उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी अद्ल घडवली या कारवाईने प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे.

 
उपविभागीय अधिकारी तथा सहाय्य जिल्हाधिकारी असणारे (IAS) वैभव वाघमारे यांनी कामात दिरंगाई बाबात अनेकदा ताकीत दिली होती सोपवलेली कामे पूर्ण न करणे, कामे वेळेत पुर्ण न करणे, अर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवणे,वरिष्ठांचा आदेश न पाळणे,हे प्रकार सुरु होतेच त्यातच लोकांच्या तक्रारी वाढत होत्या याच पार्श्वभूमीवर वैभव वाघमारे सकाळी 11 वाजता कार्यालयात उपस्थितीत झाले तर त्यांना नायब तहसीलदार यांच्यासह दहा अधिकारी कर्मचारी इतर हे 11 नंतर कार्यालयात हजर झालेले दिसले. मात्र शिपाई हेच सर्व कार्यालये उघडुन दिसल्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्य जिल्हाधिकारी (IAS) वैभव वाघमारे यांना दिसले.
उशिरा आलेल्या 10 कर्मचाऱ्यांना शिपायाच्या हस्ते निलंबनाचे आदेश देऊन सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी घराचा मार्ग दाखविला व शिपायाच्या हस्ते सर्व कार्यालयाला कुलुप लावुन घेतले व फक्त स्वतःचे दालन खुले ठेवले या कारवाई मुळे महसुल प्रशासनात कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा 🙏 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *