गौरी-गणपती निमित्त सरकारची भेट ; पुन्हा १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ Andacha Shidha

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनातर्फे दिवाळी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,गुढीपाडवा प्रमाणेच गौरी-गणपती निमित्त “आनंदाचा शिधा” आता कोणाला भेटणार याबाबत पाहणार आहोत.

महाराष्ट्र शासनाने दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती याप्रमाणेच गौरी-गणपती निमित्त शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेण्यात आला आहे.याबाबत शासनाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.
दिवाळी,गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती याप्रमाणेच ‘गौरी-गणपती’ निमित्त राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल देण्यात येणार आहे.
आनंदाचा शिधा 100 रुपयात काय काय?

केशऱी कार्ड धारक अर्थात शिक्षापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबांना अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाखो गोरगरीबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *