चंद्रावर तापमान आहे तरी किती ? Moon Temperature

नमस्कार मित्रांनो आज आपण चंद्रावरील तापमानाची माहिती बघणार आहोत. 

नुकताच भारताने चंद्रयान मोहिम राबविली यात चांद्रयान-3 ने दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर उतरल्यानंतर नवख्या वातावरणात विक्रम लँडरने एक-दोन दिवस जरा चाचपणीच केली. मात्र, तेथे स्थिरावल्यानंतर तो आता कामाला लागला आहे.त्यात आपल्याला चंद्रावरील फोटो पाहण्यासाठी मिळाले त्यात सर्वप्रथम चंद्रावरील तापमानाची माहिती दिली आहे.चंद्रावर अत्यंत कमी तापमान असेल असं इस्रोच्या शास्त्रज्ञांना वाटत होतं. मात्र, त्यांचा हा अंदाज साफ चुकला आहे. त्यानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर ७० अंश से. एवढे तापमान असल्याचे निदर्शनास आले आहे.
इस्रोचे शास्त्रज्ञ बी. एच. एम. दारुकेशा म्हणाले, आम्हाला असे वाटले होते की तापमान २० ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत असेल. मात्र, ते ७० अंश सेल्सिअस एवढे आहे. आमच्या अंदाजापेक्षा हे खूप जास्त आहे.इस्रोचे प्रमुख डॉ. एस.सोमनाथ यांनी सांगितले, की दक्षिण ध्रुवावर मानवाला वसविण्याची क्षमता असू शकते म्हणूनच विक्रम लँडर याच ठिकाणी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
तापमान मोजणारा “चास्टे’

विक्रम लँडरवर चंद्र सरफेस थर्मोफिजिकल एक्स्पेरिमेंट अर्थात चाटे या पेलोडद्वारे तापमानाची माहिती घेतली.
‘चास्टे’वर विविध प्रकारचे १० तापमानमापक सेन्सर लावण्यात आले आन्त ते पृष्ठभागाखाली १० सेंटिमीटरपर्यंत जाऊन तापमान मोजू शकतात.
चंद्रावर काय आढळले ?
पृष्ठभागाच्या आत सुमारे ८० मिलिमीटरपर्यंत तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत आढळून आले. तर, पृष्ठभागाच्या वर तापमान ५० ते ६० अंश सेल्सिअसपर्यंत मोजण्यात आले. चंद्राच्या पृष्ठभागाच्या आत विविध खोलीवर आणि पृष्ठभागावरील तापमानात खूप फरक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागापासून एक सेंटीमीटर उंचीवर तापमान ५६ अंश सेल्सिअस आहे. तर, दक्षिण ध्रुवावरील भूपृष्ठावरील मातीखालील ८ सेमीवर तापमान उणे १० आहे, अशी माहिती चास्तेकडून देण्यात आली आहे. इस्रोने या संदर्भातील माहिती ट्विटर द्वारे शेअर केली आहे
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *