नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२3 संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य कोणती आहे, या योजनेअंतर्गत किती निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना मिळतो, यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी, ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा, महत्वपूर्ण सूचना कोणत्या या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर तुम्ही हि या योजनेसाठी इच्छुक आणि पात्र असाल, तर नक्कीच या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या.
सन 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यातील चारही कृषी विद्यापिठांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचे आता लाभ मिळणार आहे.
यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये :-
1) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला)
2)महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर)
3)डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी)
4)वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी)
या चार कृषी विद्यापीठांचा यात प्रामुख्याने समावेश होतो.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कृषी पदविकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना डाॅ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहन भत्ता देण्यात येईल.
राज्यातील चारही कृषी विद्यापिठातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरतील.शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देणे जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे पुढे जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील पैशाअभावी त्यांचे शिक्षण हे अपूर्ण राहणार नाही.
निर्वाह भत्ता योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
▪️विद्यार्थींचे आधार कार्ड
▪️जातीचा दाखला
▪️रहिवासी दाखला
▪️उत्पन्नाचा दाखला
▪️पालकांचे अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असल्याचे प्रमाणपत्र वर्षाचे संबंधित तहसील अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
▪️कॅप संबंधित कागदपत्रे
▪️गॅप असल्यास गॅप संबंधित कागदपत्रे
▪️दोन मुलांचे कुटुंब घोषणा पत्र
▪️वसतिगृह दस्तऐवज (खाजगी वसतिगृह किंवा पेइंग गेस्टच्या बाबतीत, मालकाशी करार करणे आवश्यक असेल)
scholarship योजनेसाठी अर्ज कुठे करायचा (fill scholarship form) –
निर्वाह भत्याचे स्वरुप :-
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत कृषी पदविकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना डाॅ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहन भत्ता देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आलेल्या आहेत तरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
scholarship योजनेसाठी अर्ज कुठे करायचा (fill scholarship form) –
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा शेअर करा.