मेळघाट विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा भव्य सत्कार गौलखेडा बाजर येथे स्व.तुळशीरामजी काळे माजी आमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन गौरखेडा बाजार येथे करण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक केवलराम काळे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला चिखलदरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांनी हाजी हजेरी लावली यावेळी सरपंच आणि उपसरपंच सदस्य यांचा मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला उद्घाटक माजी आमदार केवलराम काळे, अध्यक्ष मनिराम दहीकर,प्रमुख पाहुणे माजी जि.प.सदस्य शांताबाई काळे,माजी प.स.सभापती कवीता काळे,जिल्हा उपाध्यक्ष यशवंत काळे, सरपंच अल्केश महल्ले,सुजित भाष्कर, आकाश जयस्वाल,ओमप्रकाश मावस्कर, संजय भाष्कर,यांच्यासह गौलखेडा बाजार, नागापूर, जामली आर, बदनापूर, मोरगड, बोराळा, अंबापाटी, चिचखेड, तेलखार, वस्तापूर, कुलंगणा, सोमवारखेडा, आकी, बागलिंगा, भांडुम आडनदी, बहाद्दपूर येथील सरपंच उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.