थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

महाराष्ट्र वैरण विकास धोरणामुळे पशुधनाला अधिक सक्षमपणे चारा उपलब्ध होईल – मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र वैरण विकास धोरणामुळे पशुधनाला अधिक सक्षमपणे चारा उपलब्ध होईल – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई दि. २९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता अधिक सक्षमपणे उपलब्ध होईल असा विश्वास राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या हेतूने नियोजनात्मक विकासाचे महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. बैठकीत ‘महाराष्ट्र वैरण विकास धोरण’ जाहीर करण्यात आले आहे. यात राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार आहे. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडीयोग्य गवतांची यादी, वैरण उपयुक्त वृक्षांची यादी, सुधारित चारा पिके, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्त्रोत यांचा विचार आणि विविध शासकीय वैरण विकास योजनांचे नियोजन यात करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या शेतीपूरक व्यवसायांना भक्कम बळ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

दुष्काळ आढावा बैठकीस उपस्थिती

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविण्याबाबत उप समितीच्या आढावा बैठकीस मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. अपुऱ्या पावसामुळे राज्यातील विविध भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, पीक नुकसान, चारा उपलब्धता तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व शेतकरी बांधवांना आवश्यक मदत याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच उपाययोजनांबाबत चर्चा झाली.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *