थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
गुरूवार, १ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

ठळक घडामोडी

अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त अभिवादन

भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवारी छत्रपती संभाजीनगरला; विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांशी साधणार संवाद

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. ३० : मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी तसेच कष्टकरी आणि माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याला आणि समाजासाठी केलेल्या त्यागाला उपस्थितांनी आदरांजली वाहिली. कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाचे सहायक आयुक्त शैलेश भगत, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी आरती देवधर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला. माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी संघटित चळवळ उभी करून कष्टकरी वर्गाला सामाजिक प्रतिष्ठा व न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची व विचारांची स्मृती जपण्यासाठी २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन देणे तसेच त्यांना स्वावलंबी बनविणे, ही महामंडळाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

मुंबई उपनगरात ४३१ लाभार्थ्यांना ४२.८९ कोटींचे कर्ज

मुंबई उपनगर जिल्ह्यात महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत आतापर्यंत ४३१ लाभार्थ्यांना बँकांमार्फत एकूण ४२ कोटी ८९ लाख ६३ हजार ६३४ रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना महामंडळामार्फत आतापर्यंत ४ कोटी ९८ लाख २५ हजार ५७० रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे.

मुंबई शहरात ४४५ लाभार्थ्यांना ४५.७१ कोटींचे कर्ज

मुंबई शहर जिल्ह्यात याच योजनेअंतर्गत ४४५ लाभार्थ्यांना बँकांमार्फत एकूण ४५ कोटी ७१ लाख ९३ हजार ९६४ रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. या लाभार्थ्यांना आतापर्यंत ५ कोटी ९७ लाख ८२ हजार ५३० रुपयांचा व्याज परतावा महामंडळामार्फत प्राप्त झाला आहे.

महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देत स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे, असे जिल्हा समन्वयक , मुंबई उपनगर, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.