थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
गुरूवार, १ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

ठळक घडामोडी

मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या थेट नियुक्तीसंदर्भातील प्रस्ताव सादर करावा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या थेट नियुक्तीसंदर्भातील प्रस्ताव सादर करावा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  • विविध नागरी समस्यांवर चर्चा

 मुंबई, दि. ३० : मोरबे धरणातील प्रकल्पग्रस्तांना बारवी धरणग्रस्तांच्या धर्तीवर थेट नियुक्तीद्वारे सेवेत घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या समस्यां सोडविण्यासंदर्भात सूचना दिल्या.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारितील १४ रेल्वे स्थानकांचे हस्तांतरण होत असताना, या स्थानकांवर वर्षानुवर्षे स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ३२३ सफाई कामगारांना मध्य रेल्वेच्या सेवेत सामावून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित दगडखाण आणि क्रशर प्लॉटधारकांच्या पुनर्वसनाचाही प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

नेरूळ रेल्वे स्थानकातील गर्दुल्ल्यांचा वावर, अमली पदार्थांची अवैध विक्री, दुर्गंधी, अस्वच्छता आणि अतिक्रमणे यांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला अधिकार सुपूर्द करावेत. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंना संरक्षण भिंत बांधून तिचे सौंदर्यीकरण सिडकोने करावे, असेही त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची स्थिती सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत. रेल्वे परिसरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि अन्य आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.