थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
गुरूवार, १ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

ठळक घडामोडी

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने संवेदनशील कार्यवाही करावी – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र २०२६ : युवकांच्या स्वप्नांना रोजगाराची नवी दिशा; एकाच दिवशी राज्यभर संधींचा महाकुंभ..!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

खासगी क्लासेस, शाळा व महाविद्यालयांच्या सहलींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार

मुंबई, दि. १ : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू अत्यंत दुःखद आणि क्लेशदायक आहे. तसेच पुढील कार्यवाही करताना प्रशासनाने संवेदनशीलपणे कुटुंबीय व नातेवाईकांनी पर्यंत संपर्क व समन्वय करावा, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितलं.

आळंदी येथील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या खासगी अकॅडमीचे विद्यार्थी दिवेआगर येथे सहलीसाठी गेले होते. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले आणि त्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे विद्यार्थी १६ ते १७ वर्षे वयोगटातील होते. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती मंत्री श्री. महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

या सहलीतील ४८ विद्यार्थ्यांसोबत केवळ दोन शिक्षक होते. विद्यार्थ्यांना पोहता येते किंवा नाही, याची खातरजमा करून त्यांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखणे ही संबंधित संस्थेची जबाबदारी होती. समुद्रकिनारे, धरणे किंवा तलावांच्या ठिकाणी सहली आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आयोजक संस्थांनी स्वीकारली पाहिजे, असे मंत्री श्री. महाजन यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून सखोल चौकशीचे निर्देश दिल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

दुर्घटना टाळण्यासाठी खासगी क्लासेस व संस्था साठी सहलींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार

यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सहलीसाठी बाहेर घेऊन जाणाऱ्या खासगी क्लासेस, शाळा व संस्था साठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील. विद्यार्थ्यांना संस्थेबाहेर घेऊन जाताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित संस्थेने स्वीकारणे बंधनकारक करण्यावर भर दिला जाईल, असे मंत्री श्री. महाजन यांनी स्पष्ट केले.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.