रेशनधारकांसाठी शिंदे फडणवीस यांचा मोठा निर्णय ¦ दिवाळीत केले पॅकेज जाहीर Retion Card Diwali Package

देशासह महाराष्ट्रात दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळीला घरोघरी गोडधोड आणि फराळ करण्याची पद्धत आहे. शिंदे-फडणवीस सरकार करणार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे.
१ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहेत.
शिधापत्रिकाधारक यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,”आज आमच्या कॅबिनेटने खूपच महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दिवाळीनिमित्त १ लाख ६२ हजार रेशनकार्ड धारकांना मिळणार आहे.
म्हणजेच ७ कोटी लोकांना साखर, रवा, चनाडाळ आणि तेल याचा एक पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याच्या वाटपाची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा. 
Whtas App ला कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *