मेंढपाळ्च्या वाड्यावर माजी आमदार केवलराम काळे यांची भेट

maharashtrasmart
2 Min Read

भेटी दरम्यान जाणून घेतल्या मेंढपाळाच्या समस्या

 
एक आठवड्यापासून आजारी असलेल्या मेंढ्या च्या मृत्यूमुळे मेंढपाळावर आर्थिक संकटासह उदरनिर्वाह कसा करावा अशा विविध समस्यांनी चिंताग्रस्त  असलेल्या मेंढपाळाची मेळघाट मतदार संघाचे माजी आमदार केवलराम काळे यांनी  मुंबईवरून परतताच थेट जणुना काळा खडक येथे जाऊन मेंढ्यांची पाहणी केली आणि मेंढपाळांना आपुलकीचा हात देऊन धीर देत मेंढपाळाच्या समस्या जाणून घेतल्या. 
मागील आठवड्यापासून घटसर्प संसर्ग सारख्या आजाराने हजारो मेंढ्याचा मृत्यू झाला होता  घटनेची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजितदादा पवार हे मेळघाट दौऱ्यावर असताना माजी आमदार केवलराम काळे यांनी जनुना काळा खडक येथील असंख्य आजारी असलेल्या मेंढ्यांची माहिती दौऱ्या दरम्यान दिली होती त्यानुसार सर्व माहिती गोळा करून अधिवेशनाच्या माध्यमातून अजित पवार यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती आणि स्वतः केवलराम काळे हे सुद्धा अजित दादाच्या पाठोपाठ मुंबई येथे दौरा केला आणि मेंढपाळाकडे तात्काळ लक्ष शासनाने देऊन  चौकशी करून औषधोउपचार साठी मदत करून शासनाने  लक्ष द्यावे  अशी मागणी या दरम्यान केली. 

मुंबईवरून परत येताच काल दुपारच्या सुमारास केवलराम काळे यांनी मेंढपाळाची भेट घेऊन उपस्थित असलेल्या पशु वैद्यकीय अधिकाऱ्याना  सोबत चर्चा करून लसीकरण पूर्ण करून घ्यावे पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून या संसर्गजन्य आजाराबद्दल कार्यशाळा ठेवून मेंढपाळांना प्राथमिक उपचाराबद्दल  मार्गदर्शन करावे मेंढपाळांना आर्थिक मदत व इतर सोयी सुविधा करीता शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार असे यादरम्यान मेंढपाळांना केवलराम काळे यांनी सांगितले. 

यादरम्यान मेंढपाळांनी केवलराम काळे यांनी विरोधी पक्षनेता अजित दादा पवार यांच्या निदर्शनात आणून दिल्याबद्दल अजितदादा यांच्या माध्यमातून शासन दरबारी मेंढ्याचा प्रश्न लावून घेतल्याबद्दल केवलराम काळे यांचे मेंढपाळकांनी आभार मानले यावेळी अमोल बोरेकार, भोजराज मोरे, अमोल वरघट, बाळुभाऊ मदने, यशवंत मदने, विठोबा मदने, अंबादास झिटे, प्रकाश मदने, सुभाष ठोंबरे, महादेव मोरे, रामकृष्ण मोरे, शिवा मोरे, यांच्यासह गावकरी, मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्यांसाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा. 
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *