स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी मेळघाट विधानसभेचे माजी आमदार तथा आदिवासी विकास महामंडळाचे संचालक कार्यकुशल केवलराम काळे यांची निवड झाली आहे.
मेळघाटमधील चिखलदरा व धारणी आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. आणि त्यातच अमरावती जिल्ह्यातील एकमेव आदिवासी बहुल मेळघाट विधानसभात असलेला आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी याठिकाणी आहे. त्या कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्यासाठी विविध लाभाच्या योजना राबविल्या जातात. मग त्यात शिक्षण,आपत्ती नुकसान भरपाई,शेतकरी योजना, खावटी योजना, आदिवासी महिला भगिनींच्यासाठी विविध योजना या कार्यालयाच्या माध्यमातून राबविल्या जातात. आणि त्याच प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी मेळघाट विधानसभेचे कार्यकुशल माजी आमदार केवलरामजी काळे यांची निवड झाल्याने आदिवासी बांधवांच्यामध्ये नवचैतन्य पसरले आहे.
एकूण या प्रकल्प समितीत सात व्यक्तीची वर्णी लागली असून माजी आमदार केवलराम काळे यांची अध्यक्षपदी तर महिला सदस्यां म्हणून मिनल रमेश धोटे,उमाताई ज्ञानेश्वर घासले यांच्यासह श्रीराम मुन्नीलाल पटेल, शालीकराम बेठेकर, अर्जुन सुखदेवराव युवनाते,राहुल अनिल पटेल यांची या आदिवासी प्रकल्प समितीच्या सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यावर माजी आमदार केवलराम काळे यांना आदिवासी बांधवांच्यासाठी उपयुक्त अशा योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माजी आमदार असुनही या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अनेक कामे केली आहे त्याचा मोठा फायदा माझ्या आदिवासी बांधवाना झाला आहे.
यापुढेही महाविकास आघाडी सरकारच्या साथीने आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहकार्याने व आदिवासी मंत्री के.सी.पाडवी मी जास्तीत जास्त कामे प्रकल्प कार्यालयात आणता येतील या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. मेळघाटमधील हजारो बांधवांना खावटी अनुदानाचा लाभ केवलराम काळे यांनी मिळून दिलाआणि त्याला जोड म्हणून आता धारणी प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी निवडही झाली आहे या दोन्हीचा समेट घालून मेळघाट विधानसभा मतदारसंघात मोठी विकास गंगा आणणार असल्याचे माजी आमदार केवलराम काळे यांनी सांगितले.
त्यांची धारणी प्रकल्प कार्यालयाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या…
आशाच नवनवीन बातमी व अपडेटसाठी स्मार्ट महाराष्ट्र फाॅलो करा.
युट्यूब साठी येथे क्लिक करा