पाण्यासाठी विहिरीत उतरून लाक्षणिक आंदोलन

                                                     विहिरीत उतरून लाक्षणिक आंदोलन

 
स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
जवळा बु येथे भिषण पाणी टंचाई बाबत ग्राम पंचायत रोहणाचे ग्रामसेवक हरणे यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यावर उपाय निघाला नाही त्यामुळे मा. गटविकास अधिकारी मानोरा यांना निवेदन देऊन पाण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्याने जवळा येथील ॲड. रवि रामराव राऊत, कैलास डोलारकर,दत्ता राऊत,रविंद्र मनवर,विजय सातपुते,गणेश सातपुते,गजानन डोलारकर,लक्ष्मण सुरोशे, महादेव शिकारे,ज्ञानेश्वर उघडे सह जवळा खुर्द (बु) येथील महिला,युवक,पुरुष यांनी विहिरीत उतरून लाक्षणिक आंदोलन केले.
उपस्थित स्थळी मा.भगत साहेब (विस्तार अधिकारी) यांनी सर्व मागण्या लेखी स्वरूपात देऊन मान्य केल्या. यावेळी मा.गोविंदराव पाटील (सदस्य पं.स.मानोरा),मा.रामराव पाटील (माजी ग्रा.प.सदस्य) मा.शामभाऊ पवार (प्रहार तालुका प्रमुख) उपस्थित होते.
नवनवीन बातम्या मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्र ला फाॅलो करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *