थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, १९ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद!

अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त – अपर मुख्यसचिव व्ही. राधा

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ (विमाका) : राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी गठित राज्य भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या दौऱ्यावर येत आहे.
यावेळी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर व हितसंबंधित घटकांशी संवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.३० या वेळेत पत्रकार परिषद, तर दुपारी २.३० नंतर जिल्हास्तरीय उमेदवार व इतर भागधारकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.
भरती परीक्षा पद्धतीबाबत अनुभव व सूचना मांडू इच्छिणाऱ्या संबंधितांनी या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *