थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, ३० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत बैठक

उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत बैठक

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. ३० : कामगार संघटनांच्या विविध मागण्यांवर आणि कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात विधान परिषदचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक झाली. बैठकीला कामगार आयुक्त, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध कंपन्या व महापालिकांचे प्रतिनिधी तसेच संबंधित कामगार संघटनांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

उपसभापती सचिन अहिर व कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी कामगारांच्या मागण्या सविस्तर ऐकून घेतल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करण्याचे तसेच कामगारांचे हक्क आणि थकीत देणी त्वरित देण्यासंदर्भात संबंधित अधिकारी व कंपनी प्रतिनिधींना सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीत राज्यातील विविध कामगार संघटनांनी मागण्या मांडल्या. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी सफाई कामगारांचा स्वतंत्र वर्ग निर्माण करणे, लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार व १९९३ व २००० च्या शासन निर्णयानुसार कामगारांना सेवेत कायम करणे, ठेकेदारी पद्धत बंद करणे, नियमांचे उल्लंघन थांबविणे, या मागण्या मांडल्या. हिंद कामगार संघटना (इंटक), रांजणगाव यांनी समान काम समान वेतन, २०१८ पासूनच्या सेवेचा वेतनवाढीसाठी विचार करणे, कामगारांना पुन्हा रुजू करून घेणे, कामगारांमध्ये दुजाभाव न करणे, पात्र कामगारांना ईएसआयसीच्या सुविधा देणे आणि आकसाने कारवाई न करण्याबाबत भूमिका मांडली. श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेने बुटीबोरी येथील मोरारजी टेक्स्टाईल लि. मधील कामगारांचे थकीत वेतन आणि जुन्या कामगारांना कामावर घेण्याबाबत मुद्दे मांडले. मॉडेल मिल्स, नागपूर येथील सुदाम शिंगणे यांनी कामगारांचे थकीत वेतनाबाबत व पीएफच्या रकमेसंदर्भात मुद्दे मांडले.

000

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.