थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, ३० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

“ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे” औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

“ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे” औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. ३० :  राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील औषध गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मुंबईतील आरोग्यसेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. राज्यातील सर्व आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या औषध साठ्याची गुणवत्ता ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे तपासण्यात येणार आहे. या तपासणीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार असून पथकांद्वारे राज्यातील आठही परिमंडळातील संस्थेमध्ये तपासणी केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून सर्व आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता यात तपासली जाणार आहे.

यासाठी आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तज्ज्ञ औषधनिर्मात्यांची (फार्मासिस्ट) स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार आहे. या टीमला ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे औषधांची तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. बैठकीत याचे सादरीकरण करण्यात आले. पुरवठा धारकांकडून पुरवठा करण्यात आलेल्या औषधांची दर्जाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीला राज्य वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बापू  पवार, आरोग्य संचालक (मुंबई ) डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक (पुणे )डॉ. विजय कंदेवाड, सह संचालक सुनिता गोल्हाईत उपस्थित होते.

0000

मनिषा सावळे/विसंअ

 

 

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.