
यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, उपकृषी अधिकारी सुनील घारोळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आनंदवाडी (गौर) येथील संयुक्त गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश संजय चामे, उपाध्यक्ष ग्यानदेव गोपाळ चामे, सचिव रमण ज्ञानोबा चामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अर्थसहाय्य देत आहे. यामाध्यमातून मळणी यंत्रे, तेल घाणे यासारख्या शेतीशी निगडित छोटे छोटे उद्योगांसह इतरही व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. यासाठी १ कोटी रुपयेपर्यंतच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येते, तर १७ लाख ५० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवक युवतींनी घेवून गावात छोटे छोटे उद्योग उभारावेत, असे आवाहन जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी केले. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मधाचे गाव या योजनांची माहिती दिली.
कृषी अधिकारी सुनील घारोळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कृषी विभागाच्या सर्व योजना डिजिटल स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महाकृषी विस्तार एआय ऍप विकसित करण्यात आले आहे. हवामान, बाजारभाव, पिकांवर येणाऱ्या किडीवर कोणत्या फवारण्या करायच्या, याबाबत माहिती या ऍपवर दिली आहे. व्हिडीओ स्वरूपातही ही माहिती दिली आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप डाउनलोड करावे. याच प्रमाणे रासायनिक खतांची घरबसल्या नोंदणी करण्यासाठी एफएफएस ऍप सुरू केले आहे.
महाडीबीटीच्या माध्यमातून विविध लाभांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी स्वतः यासाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया होत आहे, असे श्री. घारोळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेततळे, फळबाग लागवड आदी योजनांची माहिती दिली.
0000

Leave a Reply