थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

जनगणना ; शनिवारी ‘संक्षिप्त घरयादी’बाबत प्रशिक्षण

जनगणना ; शनिवारी ‘संक्षिप्त घरयादी’बाबत प्रशिक्षण

अमरावती, दि. २४ (जिमाका): जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात संक्षिप्त घरयादी आणि गणना गट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शनिवारी, २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता अर्धदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

संक्षिप्त घरयादी हा जनगणनेचा एक अत्यंत मूलभूत दस्तऐवज असल्याने त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी हे विशेष प्रशिक्षण आयोजित केले आहे. जनगणना संचालनालयाचे (मुंबई) सहाय्यक संचालक प्रविण भगत आणि  ऋषीकेश पाथरे हे उपस्थित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी क्षेत्रातील चार्ज जनगणना अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, कार्यालय अधीक्षक, जनगणना लिपिक, तांत्रिक सहाय्यक तसेच महानगरपालिकेचे शहर जनगणना अधिकारी आणि झोनचे सर्व चार्ज अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अमरावती, संतोष काकडे यांनी सर्व संबंधितांना प्रशिक्षण आदेश जारी केले असून, या प्रशिक्षणास सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *