थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

जिल्ह्यात दि.२९ सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन

परीक्षा पद्धत होणार सक्षम आणि उमेदवाराभिमुख; शिफारशी सादर करण्याचे आवाहन  

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
रायगड-अलिबाग,दि.२७ (जिमाका):– रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत जिल्ह्यात १२ ठिकाणी “रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र”चे आयोजन करण्यात येत असून याकरिता  जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करुन रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीकरिता उपस्थित रहावे.
सेवा संकल्प अभियान (१७ सप्टेंबर,२०२६ ते १७ ऑक्टोबर,२०२६) अंतर्गत दि. २९ सप्टेंबर, २०२६ रोजी कोकण व नाशिक विभागात एकाच दिवशी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत एकाच वेळी ४००+  ठिकाणी रोजगार मेळावे/प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जाणार आहेत.
राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमांचा मूळ गाभा असून हा उपक्रम राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने दि.२९ सप्टेंबर, २०२६ रोजी होणाऱ्या “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत रायगड जिल्ह्यामध्ये १२ ठिकाणी “रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात येत असून जिल्ह्यात १४९ कंपनी आस्थापनांनी नोंदणी केली आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील विविध रिक्तपदांच्या/अॅप्रेंटिसशिपची भरतीसाठी “रोजगार महाकुंभ-आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी/एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मसी पदवीधर व इतर पदवीधारक नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.
या रोजगार मेळाव्याकरीता उमेदवारांसाठी व उद्योजकांसाठी गुगल लिंक/क्युआर कोड विभागामार्फत तयार करण्यात आलेले आहे. त्यामार्फत उमेदवारांना व उद्योजकांना नोंदणी करता येईल.
नोंदणीकृत उमेदवारांकरीता दि.०७ सप्टेंबर  ते २०२६ (पहिला टप्पा) दि. ११ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६ (दुसरा टप्पा) या कालावधीत जिल्हयातील १६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt.ITI) मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये उमेदवारांचा CV बनविणे, व्यक्तीमत्व विकास, प्रभावी स्वपरीचय,  मुलाखत कौशल्य, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेची तयारी, Mock Interview, संवाद कौशल्य इत्यादी विषय घेतले जाणार आहे.
जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे, हा या उपक्रमांचा मूळ गाभा असून हा उपक्रम राज्यातील जिल्हा, तालुका व औद्योगिक परिसरांमध्ये राबविण्यात येत आहे.
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील १२ ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत. अंजुमन आय इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस, प्लॉट नं.२ आणि ३, सेक्टर १६, ठाणा नाका जवळ, खांदागाव नवीन पनवेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठ लोणेरे, ता.माणगाव. आयटीएम कौशल्य विद्यापीठ, प्लॉट नंबर २५ आणि २६, औद्योगिक क्षेत्र सेक्टर-४, खारघर, ता.पनवेल. शेठ जे.एन.पालीवाला कला, वाणिज्य, कला आणि विज्ञान महाविद्यालय पाली-सुधागड. यादवराव तासगावकर तंत्रनिकेतन महाविद्यालय डॉ.एन.वाय.तासगावकर कॉम्प्लेक्स चंधाई पो.नरसापुर ता.कर्जत. भारतीय एज्युकेशन सोशल/चॅरिटेबल ट्रस्ट मु.वेलशेत, पो.पिगोंडे, ता.रोहा. के.टी.एस.पीएम.बि.एल.पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय सेमिनार हॉल २रा माळा, बि.एल.पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय, खोपोली.  एम.जी.एम. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स ३ रा माळा, एम.जी.एम. एज्युकेशन कॅम्पस, प्लॉट नं. १ आणि २ सेक्टर ०१, कामोठे नवी मुंबई.डॉ.पतंगराव कदम, कला आणि वाणिज्य महाविद्यालय सिव्हिल कोर्ट जवळ पेण.  जे. एस. एम. महाविद्यालय महर्षी कर्वे रोड, एसबीआय बँकेच्या मागे, लिमयेवाडी अलिबाग. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ ३ रा माळा, हसमुख भवन सिडकोच्या मागे, हिरानंदानी पार्कजवळ, सेक्टर ०४, खारघर पनवेल. श्रीमती गीता ङि तटकरे तंत्रनिकेतन महाविद्यालय मु.गोवे, पो.कोलाड, ता.रोहा.
००००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.