थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

पाटणच्या नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल – पालकमंत्री शंभूराज देसाई 

पाटणच्या नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल – पालकमंत्री शंभूराज देसाई 

सातारा दि. १८ – पाटण नगरपंचायतीकडे निधीची कमतरता असून पाटणच्या अंतर्गत विकासासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल. नगरपंचायत प्रशासनाने पाणी, स्वच्छता व आरोग्य या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण येथे पाटण नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला पाटण पंचायत समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती विजय पवार, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, गटविकास अधिकारी सरिता पवार, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सत्यम जगदाळे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण शहरातील सांडपाणी नदीमध्ये जात आहे हे पाणी तालुक्यातील नागरिकांच्या पिण्यासाठी वापरले जाते त्यामुळे दूषित पाणी नागरिकांना जाऊ नये यासाठी सांडपाणी व्यवस्थापनात प्रक्रिया राबवावी यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल.
तसेच रस्ते, कचरा व्यवस्थापन व इतर अनुषंगिक कामांसाठीही शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल.
पाटण नगरपंचायतीची पिण्याच्या पाण्याची योजनेची चाचणी ऑक्टोंबर मध्ये घेण्यात येणार आहे ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पाटण नगरपंचायतीतील नागरिकांना पाणी मिळेल. पिण्याची पाण्याची योजना चालवण्यासाठी नगरपंचायतीने मनुष्यबळ उपलब्ध करावे. नगरपंचायतीचे हद्दीतील अतिक्रमणाबाबत तहसीलदार मुख्याधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा व अहवाल सादर करावा असे निर्देशही पालकमंत्री श्री.देसाई यांनी बैठकीत दिले.
0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *