
अमरावती, दि. २०: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवार, २१ सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी ‘जनसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा जनसंवाद कार्यक्रम दुपारी २ ते ३ वा. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळेत पालकमंत्री नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध राहतील.या कार्यक्रमादरम्यान नागरिकांकडून त्यांच्या समस्या, मागण्या आणि तक्रारींबाबतची लेखी निवेदने थेट स्वीकारली जाणार आहेत. प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या जनसंवाद कार्यक्रमाची नोंद घेऊन आपल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहावे.
००००

Leave a Reply