थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा शिवणाटाकळी येथे मच्छिमार बांधवांशी संवाद

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा शिवणाटाकळी येथे मच्छिमार बांधवांशी संवाद

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
छत्रपती संभाजीनगर, दि. २८ –  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दुष्काळी पार्श्वभुमिवर कन्नड तालुक्यातील शिवणाटाकळी येथील तलावाची आज पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेत त्यांना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला. श्री.राणे यांच्यासमवेत कन्नड विधानसभा मतदार संघाच्या आमदार संजना जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सह आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव तसेच आदिवासी मत्स्य व्यावसायिक सह. संस्था, आबासाहेब पाटील मत्स्य व्यवसाय सह. संस्था तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक मच्छिमार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ प्रथम कळ’ मध्ये मोडणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित तलाव, जलाशय व इतर ठिकाणी पंचनामे करण्याच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. कमी पर्जन्यमानामुळे शिवणटाकळी तलावातील पाण्याची पातळी ३४ टक्क्यांपर्यंत घटली असून, त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत असल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले.
दुष्काळी पार्श्वभुमिवर मच्छिमार बांधवांचे होणाऱ्या नुकसानीचे मोजमाप व पंचनामे करून नियमानुसार योग्य ती मदत मिळवून देण्यात येईल,असे नितेश राणे यांनी उपस्थित मच्छिमार बांधवांना आश्वस्त केले. तसेच राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मच्छीमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. महिला मच्छीमार बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या मत्स्यजन्य उपपदार्थांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनही श्री. राणे यांनी यावेळी दिले.
०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.