थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
गुरूवार, २९ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

कोल्हापूर, दि. २९ (जिमाका): राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर राज्यपालांनी मातुर्लिंग श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.

यानंतर पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असलेल्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी त्यांनी केली. याकामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राठोड व धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी माहिती दिली.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्नील पवार, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच देवस्थानचे पुरोहित प्रमोद उपाध्ये, बाळासाहेब दादरणे आदी उपस्थित होते.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.