थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

लोकसंवादातून शासकीय योजनांची जनजागृती

लोकसंवादातून शासकीय योजनांची जनजागृती

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

यवतमाळ, दि. २२ (जिमाका) : गणेशोत्सवानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय, कृष्णा ऑर्थोपेडिक केअर आणि श्रीराम गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोकसंवाद आणि ‘आरोग्याचा श्रीगणेशा’ उपक्रमांतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

हे शिबिर यवतमाळ शहरातील माईंदे चौक येथील श्रीराम गणेश उत्सव मंडळ येथे घेण्यात आले. या शिबिरात नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ईसीजी व इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान केल्यानंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय राठोड, श्रीराम गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिजित पायेकर, डॉ. अतुल पाटील, आरोग्य मित्र पवन वारे, प्रिया घोडमारे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजना, आरोग्यविषयक जनजागृती, नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.