थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत श्री गणेश मंगलमूर्ती संस्थेत नागरिकोपयोगी विषयांवर जनजागृती

‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत श्री गणेश मंगलमूर्ती संस्थेत नागरिकोपयोगी विषयांवर जनजागृती

सोलापूर, दि. २४ : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने उत्तर सदर बझार, सोलापूर येथील श्री गणेश मंगलमूर्ती बहुउद्देशीय संस्था येथे ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत नागरिकोपयोगी विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध सेवा, उपक्रम आणि जनजागृतीपर माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी नागरिकांना सायबर सुरक्षा, महिला व बाल सुरक्षा, पाणी संवर्धन, पर्यावरण संवर्धन यांसारख्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि उपलब्ध विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती याबाबतही जनजागृती करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदयसिंग रामसिंग आंबेवाले, उपाध्यक्ष खुशाल मोहनसिंग सखी, खजिनदार विशाल विजय फटफटवाले, सचिव किसन रामसिंग बडूरवाले तसेच राजूसखी रमेश तरंगे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते. ‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून विविध महत्त्वाच्या जनजागृतीपर विषयांची माहिती देण्यात आली.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *