थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत कडेगाव तहसीलदारांनी येतगावमध्ये साधला जनसंवाद

रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र २०२६ : युवकांच्या स्वप्नांना रोजगाराची नवी दिशा; एकाच दिवशी राज्यभर संधींचा महाकुंभ..!

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सांगली, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगली व कडेगाव तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील सन्मित्र गणेश मंडळास भेट देऊन गणेशभक्त व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल व्ही. यू. मुंडे, सर्फराज मुल्ला, वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम यांच्यासह श्रीरंग उथळे, धनाजी पाटील, दशरथ पाटील, दत्तात्रय सूर्यवंशी, मुजबू अत्तार तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांशी संवाद साधताना तहसीलदार अजित शेलार यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नागरिकांनी महसूल विभागाचे कामकाज, शासकीय सेवा व योजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महसूल विभागाचे कामकाज तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम यांनी सायबर सुरक्षेबाबत नागरिकांना विशेष मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. मोबाईलवर प्राप्त होणारा OTP, बँकविषयक माहिती, पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे त्यांनी सांगितले. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देताना काळजी घ्यावी. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास विलंब न करता सायबर सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, आपत्कालीन परिस्थितीत ‘डायल ११२ ’ सेवेचा वापर कसा करावा, याबाबतही वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल सागर निकम यांनी उपस्थितांना माहिती दिली. पोलीस मदत, आपत्कालीन परिस्थिती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रसंगी तातडीने मदत मिळविण्यासाठी या सेवेचा उपयोग करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सन्मित्र गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.