थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सातारा दि.१९: जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलत नगर येथे लोकसंवाद २०२६ कार्यक्रम पार पडला. यामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अजित देसाई यांनी उपस्थित तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विविध आस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शक केले.


कार्यक्रमादरम्यान देसाई यांनी स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वासाने परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच सरकारी व निमसरकारी खासगी उद्योगांमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून, योग्य दिशा आणि सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले
०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *