थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

लोकसंवाद- २०२६: कोरेगाव येथे २९ सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन

लोकसंवाद- २०२६: कोरेगाव येथे २९ सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा दि. २१: सध्याच्या बदलत्या काळात नोकरीसाठी अनुभवासोबतच आधुनिक कौशल्यांची नितांत गरज निर्माण झाली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळवून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी कोरेगाव दर्पण कॉम्प्युटर येथे महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील धनाजी बागल यांनी केले आहे.

कोरेगाव येथील दर्पण कंप्यूटर येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकसंवाद-2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, दर्पण कंप्यूटरचे संस्थापक संतोष नलावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आधुनिक उद्योगजगतेला अपेक्षित असलेले कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि रोजगाराच्या शोधात असलेले तरुण यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

कोरेगाव तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी आपल्या अनुभवाला आणि शिक्षणाला योग्य संधी मिळवून देण्यासाठी या महाकुंभ रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनाजी बागल यांनी केले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *