थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

शाळांच्या दुरुस्तीला निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री झिरवाळ

शाळांच्या दुरुस्तीला निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री झिरवाळ

हिंगोली, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्ती व आवश्यक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी आग्रही असून, यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री झिरवाळ यांनी आपल्या दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यात हाताळा, ताकतोडा आणि मन्नास पिंपरी या गावांना भेटी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, जिल्हा कृषी अधीक्षक प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

ताकतोडा येथील शाळा इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा समाधानकारक असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळाच भावी पिढीला सक्षम घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *