थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

सेवा संकल्प अभियानाची मराठवाडा विभागात सक्षमतेने अंमलबजावणी करा : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

महामहिम प्रिंस रहीम आगा खान यांचे मुंबईहून हैदराबादकडे प्रयाण

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ : सेवा संकल्प अभियानाची मराठवाडा विभागात सक्षमतेने, नियोजनबद्ध व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज घेतलेल्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून अभियानातील प्रत्येक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

उद्यापासून शासकीय निर्देशानुसार नियोजित प्रत्येक दिवसाच्या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होईल आणि त्याचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेल, याकडे सर्व अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सेवा सेतू शिबिरे, विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ, स्वच्छता व श्रमदान, जनजागृती तसेच ‘सेवा माझे योगदान’सह अभियानांतर्गत नियोजित सर्व उपक्रमांमध्ये विभागातील आठही जिल्ह्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *