थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

सेवा हक्क आयुक्तांनी घेतली अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची भेट

सेवा हक्क आयुक्तांनी घेतली अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची भेट

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

अमरावती, दि. १७ (जिमाका): राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी आज शासकीय विश्राम भवन येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव व्ही. राधा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या’ (सेवा हक्क कायदा) अंमलबजावणी व सुरू असलेल्या जनजागृती उपक्रमांबद्दल माहिती दिली. श्रीमती राधा यांनी या उपक्रमांचे आणि सेवा हक्क कायद्याबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

श्री. डोंगरे यांनी श्रीमती राधा यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबतचे जनजागृती पत्रिका भेट दिली.पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन.रामास्वामी,विभागीय आयुक्त नयना गुंडे यावेळी उपस्थित होत्या.

००००००

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.