थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

१२३ वर्षांची परंपरा जपणाऱ्या गणेश मंडळात ‘लोकसंवाद’चा संदेश

१२३ वर्षांची परंपरा जपणाऱ्या गणेश मंडळात ‘लोकसंवाद’चा संदेश

हिंगोली, दिनांक १८ : हिंगोली शहरातील गणपती चौक येथे १२३ वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या श्री सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाची जनजागृती करण्यात येत आहे. मंडळाच्या दर्शनी भागात ‘लोकसंवाद-२०२६’बाबत माहिती देणारे बॅनर लावण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत असल्याने शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गणपती चौकातील या मानाच्या गणेश मंडळाला नुकतीच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेट देऊन गणरायाची आरती केली. त्यामुळे हे मंडळ गणेशभक्तांसह नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. १२३ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाच्या माध्यमातून यंदा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबत सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात येत आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष विलास गोरे तसेच रजनीश पुरोहित, निखिल बांगर, संजय पवार, सुनील पाठक आणि विजय गुंडेकर यांना ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाची माहिती देण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या ठिकाणी नागरिकांना सहज दिसेल अशा दर्शनी भागात लोकसंवादचे बॅनर लावण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते.

मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबिर

श्री सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले जाणार आहे.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *