केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन – smartmaharashtra.in थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

  


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन


दुवा कॉपी केला!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज परळ येथील प्रसिद्ध लालबागचा राजा श्री गणेशाचे कुटुंबीयांसह दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शहा, मुलगा जयेश शहा, मुलगी आणि नात उपस्थित होत्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष सागर गुप्ता आणि मानद सचिव सुधीर साळवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. मूर्तिकार श्री. संतोष कांबळी यांनी यंदाची श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government


maharashtrasmart@gmail.com
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart@gmail.com

maharashtrasmart@gmail.com हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *