थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; आधार अपडेटेशन, ई-केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन

‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; आधार अपडेटेशन, ई-केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन

नंदुरबार, दि. २३ (जिमाका) : माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘गणेशोत्सवातून लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘लोकसंवाद’ अभियानाच्या माध्यमातून विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात जाऊन शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत आज नंदुरबार तालुक्यातील पाटीलगल्ली, (वाघाळे) येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महाईसेवा केंद्र चालक योगेश गावित यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्य शासनामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा-आयडी’ कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी महा-आयडी कार्ड तयार करणे, ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी पूर्ण करावी असे सांगितले.

यावेळी कृषी, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, कौशल्य विकास, सहकार आदी विभागांच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. संबंधित योजना कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येतात तसेच अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचत असल्याने ‘लोकसंवाद-2026’ अभियान अधिक परिणामकारक ठरत आहे. उपसंपादक संदीप गावित यांनी ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाची माहिती दिली. तसेच गणेश मंडळांनी ‘बाप्पा डॉट कॉम’वर नोंदणी करावी, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील दिनेश चौरे, विकास नाटे, चंद्रकांत अहिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य धनाजी गायकवाड, सखुबाई गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष उदय गांगुर्डे, सचिव रोशन गांगुर्डे, खजिनदार तुषार गायकवाड, ग्रामस्थ हरी गावित, शांताराम गांगुर्डे, नामदेव गायकवाड, देवराम गायकवाड, मोतीलाल गावित, संतोष पवार, महेंद्र गावित, निर्मलाबाई गांगुर्डे, तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच  ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *