थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘दिलखुलास’मध्ये जमाबंदी आयुक्त अणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे श्री. शैलेश नवाल (भा.प्र.से.) यांची विशेष मुलाखत

‘दिलखुलास’मध्ये जमाबंदी आयुक्त अणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे श्री. शैलेश नवाल (भा.प्र.से.) यांची विशेष मुलाखत

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि.२३ : जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण, डिजिटायझेशन आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या विविध डिजिटल सुविधांबाबत जमाबंदी आयुक्त अणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे आयुक्त श्री. शैलेश नवाल (भा.प्र.से.) यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे. शुक्रवार, २५, शनिवार, आणि सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७:२५ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर ही मुलाखत प्रसारित होईल. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी जमाबंदी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती नवाल यांनी या मुलाखतीतून दिली आहे. याचबरोबर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होत असलेल्या सुविधा, ऑनलाइन सेवा आणि ‘ई-प्रमाण’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती तसेच जमिनीच्या नोंदींमध्ये आढळणाऱ्या चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज व सेवा, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा, महसूल सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही या मुलाखतीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील महसूल सेवा, तसेच नागरिकांनी आपल्या जमिनीच्या नोंदी नियमितपणे तपासून शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही या मुलाखतीत करण्यात आले आहे.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.